हार्टबीट्स १

Started by vishalingle25793, April 28, 2016, 07:21:53 PM

Previous topic - Next topic

vishalingle25793

नजरेने कळतो म्हणे नजरेचा नेम. ..
बघ तुला दिसतं का माझ्या डोळ्यातलं प्रेम. ..

प्रत्येकच गोष्ट थोडीच वेड्या नजरेनं कळते,
कधी कधी शब्दांत मांडावं हि लागतं. ..
वहितलं हे हि पान कधी कधी उलगडावं लागतं. ..

हे हि बोलावं लागलं तर काय अर्थ आहे?
नजरेने जो कळत नाही न प्रेमात
तो अर्थच व्यर्थ आहे. ..

अर्थ कळला नं तरी ओठांना गप्प रहावं लागतं,
नजरेनेच नजरेला मग उत्तर द्यावं लागतं. ..
नजरेचा होकार मग नजरेलाच कळत नाही,
म्हणून ओठांवर हे हि आणावं लागतं. ..

होकार तर कळला पण बंधनांचं काय?
हृदयाचं ठीक पण स्पंदनांचं काय?

हृदयासोबत घे स्पंदनांनाही सावरून. ..
काही बंधनं तोडणं शक्य नसतं,
बस्स शेवटचं घे मला समजून. ..

-
© Vishal Ingle
(7776943516)