न राहून ...

Started by abhishek panchal, April 28, 2016, 10:03:46 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

शब्दांची ती व्यथा , शब्दांनाच माहीत
ताबा सुटून बाहेर , निघतात ते घाईत
कट्याराप्रमाणे , पार काळजामध्ये घुसतात
वार करण्यासाठी , उगाचच कंबर कसतात
आरपार वार , अगदी हृदय भेदून काढतं
कोमल ते मन , एका क्षणातमध्ये मोडतं
अपराधाची त्याला ,मग जाणीवही होते
चूक सांगण्या खरी , ते तुझ्यापाशी येते

अपराधी मी नाही , असं बजावतं ते मग तुला ,
न राहून शब्दही विचारतात,
एव्हढी धार का लावलीस मला ?

आकाशाला भिडण्याची , स्वप्न उरात आहेत
तिथपर्यंत पोहोचण्याचे , प्रयत्नही जोरात आहेत
तऱ्हेतऱ्हेचा त्रास देऊन , नियतीही बेजार झाली
प्रश्न तिच्या मनी , याला जिद्दीने कशी साथ दिली
अगदी नजरेसमोर ध्येय , अन तुझे पाय थांबले
अगदी दोन पावलांचे अंतर , मग उगाचच लांबले
माझी साथ होती , पण तू मधेच हात सोडला
आधार असून माझा , तू मधेच येऊन पडला

मग जवळ येऊन तुझ्या , काही विचारतेय तुला ,
न राहून जिद्दही विचारते ,
असं मधेच का सोडलस मला ?


मान आहे तुला , तितका अपमानही होतो
कोंडून मला असं , तु दूर निघून जातो
राग लोभ सारं , तू गिळून का प्याला ?
कोंडून जगता जगता , तू मधेच मरून गेला
तुझ्या साऱ्या व्यथा , का कुणासमोर नाही ?
बाहेर घे मला , अगदी आशेने ती पाही
कधी बाहेर घेता घेता , तू आत डांबतो मला
असं क्रूर वागणं तरी , कसं जमतं तुला ?

मला काय वाटेल , याचा विचार का नाही केला ?
न राहून भावनाही विचाराते ,
असं डांबून का ठेवलंस का मला ?

सुख म्हणजे , नक्की असतं तरी काय ?
उत्तर शोधल्याशिवाय , तुला चैन पडत नाही
सुखासाठी तू , नेहमीच तळमळताना दिसतो
नियतीच्या जाळ्यामध्ये , का असे फसतो ?
क्षणभंगुर सुखापायी , तू मुक्त होत नाही
दुरूनच तुला , कुणी हसतच पाही
मला दूर ठेऊन , हा पार खचून गेलाय
दुःख घेऊन उशाशी , जगता जगता मेलाय

मी तिथेच उभा आहे , फक्त जवळ घे तू मला
न राहून समाधानही विचारतं ,
एवढं लांब का ठेवलंस मला ?

                            - अभिषेक पांचाळ