निखाऱ्याचे खेळणे

Started by विक्रांत, April 28, 2016, 11:10:40 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

निखाऱ्याचे खेळणे माय, 
नको देवू आता हाती
किती जन्म झेलायाचे
इंगळ मी सांग हाती

खरं आहे सवयीने 
आता हात जळत नाही
निखाऱ्याशी खेळणे हे
पण मन विसरत नाही

जळतांना निखारा तो
मन हळू राख होते
कुणा मिळे धग सुख
जीवनाची खाक होते

निखाऱ्याना सांग आता
झेलण्याचे दिन गेले
जळतांना हसण्याचे
मूर्ख बलिदान गेले

आता झाले निखारा मी
जग सारे जाळणारा
अशी राख होणार ना
मीच आता सूर्य तारा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/