गोरी आहे बरी आहे

Started by विक्रांत, April 28, 2016, 11:15:01 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

गोरी आहे
बरी आहे
मुख्य म्हणजे
नोकरी आहे

तिला एक
मित्र होता
बऱ्यापैकी
क्लोज होता

उडती खबर
ये कानावर
असू देत
असलातर

आपण कुठे
धुतले आहोत
रामचंद्र की 
अवतरले आहोत 

घर सांभाळीन
म्हणते ना
नाते जपेन
सांगते ना

पुढचा असे
कुणा भरवसा
शब्द तरी ती
देतेय तसा 

एवढे काय   
कमी आहे
चंद्र चांदने
तमी आहे

अखेर जगणे
काय असते
तिची त्याची
गोष्ट असते 

उगाच कुठे 
घसरू नको
तू चाक एक
विसरू नको

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/