असताना तू

Started by meenakshi mali, April 29, 2016, 06:56:42 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

तुझ्या मायेच्या
स्पर्शासाठी तेव्हाही असच
झटत रहायची मी पण
तो स्पर्श तू कामात असल्यानं
कधी झालाच नाही
तू असताना गं
तुझ्या मांडीवरही मला
कधी निजायला मिळालं नाही
तुला त्रास नको म्हणून
मी शाळेला डबा कधी नेला नाही
हे तुला कधी सांगणंच झालं नाही
तूअसताना मला
तुझ्या जवळ बसून मैत्रीणीसारखं
बोलायलाही मिळालं नाही
लोटली कित्येक वर्ष
तू नाहीस हे सत्य
मन कबूल करायालाच
तयार होत नाही
तू असताना मला
तुला घोट विषाचे घेताना
थांबवता आलं नाही
दुःख तुझं मला कधी कमी
करताच आलं नाही
तू म्हणायचीस काहीतरी
करून दाखव मोठ
होऊन दाखव
जाताना म्हणत होती
नको जगूस एकटी बाळा
खाईल हे जग
पडशील एकटी काढून टाक
ऑक्सिजनचे मास्क
तूझे शब्द कानावर पडायचे
मार्गच बंद होते
मी बेशुध्द होते
तू जाताना पहाताही आलं नाही
जेव्हा शुध्द आली मी
स्मशानभुमीत उभी होते 
अंगात अवसान नव्हतं
शब्द केव्हाच हरवले होते
तुझी राख समोर होती
नी मी रडलेही नाही
फक्त डोळे डबडबले
कारण मी कोणय हेच
मी विसरले होते
भान मी हरपले होते
सावडायला मला
स्मशानभुमीत उभे केले होते
ते मलाही कळले नाही
असतानाही तू
तुझ्या जवळ मला तुझ्या
मांडीवर कधी निजता आलं नाही
जाताना तू तुझ्याबरोबर
मला येताही आलं नाही
तुझ्या काव्यांनं बघ
सारं जग तुझ्यावर प्रेम करू लागलंय
पण हे पहायलाही
तू आज नाही
का गं आई  रडतंय काळीज ढसढसा
पण तेव्हा रडलं नाही.....
Meenakshi
Pune
कवितांना प्रचंड तुम्ही प्रतिसाद देताय मी तुमची आभारी आहे Thanks All of you