ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 09:58:33 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

चल दोस्ता तुला दुष्काळी भाग दाखवतो
इथून तिथून लावारूप धरती दाखवतो
सुनसान जमीनीत पडलेल्या भेगामध्ये
त्या जळलेल्या काळजांचे अश्रू दाखवतो!!

चल दोस्ता ,,,

चल दोस्ता तुला दुष्काळी गाव दाखवतो
दुःखी पाराच्या मनातील आक्रोश दावखतो
पारतळ गाठल्या विहिरींच्या पोटातील
थेंब थेंब पडणाऱ्या अमृत धारा दाखवतो !

चल दोस्ता ,,,

चल दोस्ता तुला दुष्काळी घर दाखवतो
आड्याला डांगलेल्या अपेक्षा दाखवतो
अन्ना वाचून सुकलेली मन पाण्यावाचून
विझल्या चूल्याची पेटती आग दाखवतो!

चल दोस्ता ,,,,

चल दोस्ता तुला दुष्काळी मन दाखवतो
उष्णतेचे घाव सोसणारे काळीज दाखवतो
कपाळाच्या त्या भाग्य रेषेतून निघणारा
कष्टाच रक्त वितळून बनता घाम दाखवतो!!

चल दोस्ता ,,,,

चल दोस्ता तुला दुष्काळी घाव दाखवतो
आटलेल्या गाईच मेलेल वासरू दाखवतो
पोट भूक तहानेच्या त्या आक्रमकते मुळे
ती घरटी सोडून उडणारे पाखरू दाखवतो!

ललित कुमार
wapp-7744881103
*****************