ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 10:14:45 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

सध्या शासन चालवतय मुली बचाव मोहीम
सांगा समाजात कुठपर्यत पोचली ही मोहीम !!

हुंडाप्रथा बंदी कायदा होऊन वर्ष लोटली
तरी मुलीच्या लग्नात बापाने जमीन विकली!!

जगात स्त्री शिकून पुरुषा बरोबरीला
आपल्या देशात महत्त्व घरकाम हूशारीला!!

आपल्याकडे सर्व लक्ष मुलाच्या शिक्षणात
मुलीला म्हणतात ती जाईल दुसऱ्याच्या घरात!!

तरी काही घरातुन मुली शिकवल्या जातात
घर बदलताच तिच्यावर अधिकार गाजवतात!!

शासनाने कितीही प्रयत्न केले स्त्री प्रगतीसाठी
गरज समाज मानसिकता बदलने स्त्री जीवनासाठी!!

ललित कुमार
wapp-7744881103