ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 10:18:55 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

हसाल तुम्ही दुसऱ्यावर
तर दात तुमचेच दिसतील
जर काळाचा घाव झाला
लोक तुम्हाला ही हसतील!,

जर वाईट चिंतले कोणाचे
तर तुमचे बरे कसे होणार?
राहून शुध्द विचार संगतीने
जगात नाव तुमचे होणार!,

तुम्ही अविचारी बोलल्यावर
तुम्हाशी चांगले कोण बोलेल
शांत! विचार करून बोलला
तुमच्या विरोध कोण करेल!,

हे जग जशास तसे आहे
सर्व वागणूकी नूसार आहे
सम्मान करा इतर मनांचा
ही मानवाची ओळख आहे,!

ललित कुमार
wapp-7744881103
-------+++---------------