ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 10:21:51 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

नदीनाले वाळू माफियांनी
खोदून कोरून काढली,
टेबलाखालुन घेणाऱ्यांनी
हर हद्द आता ओलांडली,!

संट्टा मटका चालवनारे पहा
रोज गरीबाला लुटून घेतात
हातभट्टीच्या आशीर्वादाने
रोज संसार उन्हात येतात,!

गुटखा बंदी करण्यात आली
गुटखा माफिया तयार झाले
अर्धा वाटा टेबलावर ठेऊन
गल्लीबोळात विकते झाले!!

चरस गांजावर बंदी रे म्हणे
मग चिलमी कशा पेटतात?
काय चांलल समजेना मला
बंदी वस्तू कशाकाय भेटतात?

बिडी-सिगारेट धुराला तर
सार्वजनिक ठिकाणी बंदी
मग कसेकाय असता राव
सार्वजनिक ठिकाण गंदी??

ललित कुमार
wapp-7744881103
------------------------------