ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 02:47:24 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कोरड्या झाल्या विहिरी
अन घागरी झाल्या खाली
तापट सूर्याच्या दहशतीने
जीव करतो,! पाणी पाणी!!

बाळ रडते घरट्यामंध्यी
शोधे चिमणी दानापाणी
उघडी झाली धरतीमाय
कुठे भेटेल चोचभर दानी,?

पाखरे उडून दूर गेली
अन जीवणे झाली सुनी
भुक तहान ते अश्रूपाहून
ह्या काळजाच झाल पाणी,!

कर्ज झाल डोक्यावरती
अन सावकार आला घरी
दुष्काळाने बळीराजाच्या
स्वप्नांनाच पाडली रे तडी,!

पावलंपावलं घाम फुटला
अन थकला आता धनी
शासन दरबारी मदतीची
फक्त भेटे आश्वासनी वाणी,!

ललित कुमार
wapp-7744881103
---------------------------------