ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 02:49:42 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

माझा लढा चालूच आहे
शब्दांची तलवार करून
अन्याया विरोधात उतरलो
मी संविधानाची ढाल करून !!

माझा लढा लढण्यात मला
संविधानाचा आधार आहे
माझ्या वरील अन्यायाला
चिरण्याचा अधिकार आहे!!

माझा लढा घाव घालेल
त्या भ्रष्टाचारी विचारांवर
सर्वसामान्यांच्या भावणांशी
खेळणाऱ्याच्या काळजावर!!

माझा लढा पाहणाऱ्यांच्या
मनात अन्याय विरोध उठेल
वर्षानूवर्ष दाबलेली आग
एकसंघटीत होऊन पेटेल!!

माझा लढ्यात अनेकांनी
एकसाथ यायला पाहिजे
आपसातील भेद सोडून
माणवता पुजली पाहिजे!!

ललित कुमार
wapp-7744881103
--------------------------------