कुणी कुणाच राहिल नाही

Started by sneha31, April 29, 2016, 05:14:00 PM

Previous topic - Next topic

sneha31

कुणी कुणाच राहिल नाही .......

चांगलेपणाचे मुखवटे घालुन
दुर झाली नाती
आपलेच झाले परके
कुणी कुणाच राहिल नाही

का कळेना स्वाथी झाल मन
या मुखवट्यांच्या जगात
आपलेपणा सोडुन
लोकांकडे उरल फक्त धन
कुणी कुणाच राहिल नाही

व्यस्त झाले सगळे
आपल्याच माणसांसाठी
नाही कुणाकडे वेळ
कुणी कुणाच राहिले नाही

समोरासमोर उभे राहुन
वाकडी केली नजर
संपत्तीच्या नदात
कुणालाच नाही फुटल पाझर
कुणी कुणाच राहिल नाही.

स्नेहा माटुरकर
नागपुर