कसं रे दादा

Started by meenakshi mali, April 30, 2016, 06:51:30 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

गोरी गोरी नवी नवरी
म्हणून डोक्यावर बसली
पहील्या दिवशीच
जिरे मोहरी मी
खात नाही म्हणली
कुठलीच भाजी
हिला कधी नाही आवडली
कशी रं हि जगली
पाणी पुरी भेळ खाऊन
लोकाच्या उरावर नाचली
कशी रं ही आवडली
दुनियेला येड लावत गेली
लोकाच्या उटारेटा हिला
कधी घरात नाय बसली
कुणाच्या घरात काय शिजतय
डोळा लावून बसली
दारोदार जाती
मरणाचं उसणवार करती
कसं रं ही आवडली
चपाती भाजीला नाक मुरडती
मांस नाय अंगावर
मिजास किती करती
मागून मागून लोकाचं खाती
स्वतःतचं  झाकू झाकू कपाटात ठेवती
लोकाचं वाकू वाकू बघती
कसं रं हि तुला आवडली
गोरी गोरी म्हणून
डोक्यावर बसली
दुनियेला हि फिरवून आली
बोटावर जगाला नाचवत राहीली
लग्न करून तुझ्याबरोबर आली
आल्या रडू रडू कांगावा करू लागली
घरदार तोडलं माणसातनं उठवलं 
आता ही शांत नाय कशी झाली
नऊ वाजलं तरी पसरली
अंघोळ कुणी काढली  म्हणून
शिव्या देऊ लागली
कसं र ही तुला आवडली
गोरी गोरी नवी नवी म्हणून डोक्यावर बसली
जग हसतय येडी म्हणतय
तरी बया मिजास करत राहीली
लोकाची  ताटं भरून आणती
खा खाती परत नाय आवडलं
वर  खोटं बोलती
पोरं येडी केली
मी नाय त्यातली
म्हणून वर सांगत बसली
कसं रं ही आवडली....
तुमचा बाप नको
बहीण नको म्हणून
रडत राहीली
त्यासाठी निघून गेली
घर तुटलं म्हणून आनंदानं नाचली
घरी परतली आता
तुला स्वयंपाक करायला लावती
बाहेर फिरायला चला रोज नाचती
रोज किती हजाराला गंडा घालती
दादा रं कसं रं हि तुला आवडली
नुसताच नट्टापट्टा
काम नाही करत पटापटा
आळस भरलाय अंगात
देवपुजा हिला माहीत नाही
देव म्हणजे काय म्हणती
उठलं की बया आयतं ताटावर बसती
लहान लेकरागत घरभर सांडवती
खाता खाता आवाज करती
लोकं किती खातात बघती
उरल का नाय टेंशन घेती
नुसताच खायला पाहीजे चाट
रोजचा रोज नवा थाट......