फक्त एकदाच

Started by meenakshi mali, April 30, 2016, 01:58:18 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

फक्त एकदाच
दुरून का होईना
तुला पहायचंय
तू सुखीयस का ?
खंत नाही
तू तुझा मार्ग निवडल्याची
पण तुला दुःखी ही
नाही पहायचंय
प्रेम म्हणजे काय
सा-या जगाला दाखवायचंय
फक्त एकदाच
तुला खळखळून हसताना पहायचंय
सुखी रहा कुठेही
शेवटपर्यंत हेच सांगायचंय
हया जन्मी नाही झालं
पुढच्या जन्मी आपण भेटायचंय
दुस-याचं मन जपणं हेच प्रेम
त्यासाठी कुणी जीव घेऊ नका
कुणी जीव देऊही नका
हे ओरडून जगाला सांगायचंय
कधी आपण भेटलो
कधी दुरावलो हे सारं विसरायचंय
कारण तुला
फक्त सुखी पहायचंय..
पण फक्त एकदाच
अखेरचं तुला पहायचंय
कारण तुझ्यापासून
मला खुप दूर जायचंय.....
Meenakshi