वेडी आशा

Started by meenakshi mali, April 30, 2016, 02:15:34 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

तू येशील
खुप आशा होती
वादळं कायम
माझ्या सभोवताल होती
सोबत समाजाची
कडवट शब्दांची फुलं
माझ्यावर उधळत होती
पदरात एक पिलू
टाकून तू निघून गेला
तरी कुठतरी आस होती
कर्तव्याची माझ्या मलाही जाण होती
प्रेम केलं मी
मला कधीच तुझी
साथ सोडायची नव्हती
आसवांच आभाळ असलं
तरी त्याचा पुर होऊ देऊन
कधी मला वहायचं नव्हतं
पिलासाठी माझ्या मला
आई नी बाप दोन्ही
व्हायचं होतं
प्रेमच केलं ना  मी
काय माझं चुकलं होतं ?..
Meenakshi

NARAYAN MAHALE KHAROLA