एक घाव...

Started by meenakshi mali, April 30, 2016, 04:00:28 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

एक घाव भरताना
हृदय तुटताना
तुटके हदय सांधताना
काटेरी वाटेवर चालताना
आठवण तुझी येते
हे दुःखाचं आभाळ झेलताना
ठेच लागताच
पायातून रक्त वहाताना
विचारात गुंतताना
डोहात या संसाराच्या बुडताना
एकटच असल्याची जाणीव होताना
आभाळ बरसतं डोळयातून
न थांबण्यासाठी आणि
आठवणींचाही कल्लोळ होतो
विचार करताना
तू समोर उभीच रहातेस
नसली तरी
जिवन जगताना ....
Meenakshi