महाराष्ट्र देशा...

Started by गणेश म. तायडे, May 01, 2016, 08:11:27 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो
मी मराठी मातीत वाढलो
माय माऊली मातीला समजलो
कष्ट करून मातीला जाणलो
हिंमत ना कुणाची कसली
वार सोसाया उभे ठाकलो
कोकण विदर्भ असो मराठवाडा
महाराष्ट्राचा अभिमान मानतो
सुंदर रूप नकाशावरती
महाराष्ट्र माझा उठून दिसतो
थोरपुरुष महाराष्ट्री जन्मले
विचारांचा इथे सडा सांडतो
तापी कृष्णा असो चंद्रभागा
प्रवाह नद्यांचा मनात उसळतो
साधू संतांच्या भुमित माझ्या
संस्कृतींचा वारा वाहतो
धन्य जाहलो जन्मुनी इथे
जिथे शिवबाचा स्वराज्य नांदतो
जय जय जय महाराष्ट्र देशा
एकच जल्लोष मनात वसतो
गर्व नाही पण अभिमान आहे
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो

- गणेश म. तायडे,
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com