एकच सवाल

Started by Shri_Mech, May 01, 2016, 08:53:20 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

एकच सवाल

आज जाताना परसातल्या चाफ्याने विचारलं,
पण मी ऐकू आलं नसल्याच भासवून आलो....

दुपारी आॅफीसमधल्या शांततेने विचारलं,
पण मी उत्तराला बगल देऊन आलो....

सायंकाळी घरच्या झोपाळ्याने अडवलं,
पण मी त्याकडे कानाडोळा करुन आलो....

निजताना हळूच रातराणी कानात कुजबुजली,
मग मात्र मी अश्रुंना थांबवू शकलो नाही.....

सकाळपासून या सर्वांचा एकच सवाल,
आज तरी बोलली का रे ती ?


Shri_Mech
Shri_Mech