ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 02, 2016, 08:29:53 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

जसा जसा लाल गोळा पेटत आहे
तसे तसे काळीज माझे जळत आहे,!
विझवायला काळजाची आग आता
कोस कोस चारी दिशा चालत आहे,!

भेगा जमीनीच्या दुःख सांगत आहे
पाऊल परत संगतीन कणत आहे,!
एकमेकांचे आधार होऊन आम्ही
त्या काळ्या ढगांची वाट पाहत आहे,!

आज हवा ही अन्याय करत आहे
श्वासातुंन आग ह्दयात लागत आहे,!
शरीरात रक्ताची वाफ होऊन आता
माझी चमडी घामाने लाल होत आहे,!

मी झाड्याकडे आसरा मागत आहे
तो अबोल राहून दुःख सांगत आहे,!
दोघांची कथा ही सारखीच आमची
तो मी एकमेकांस पाहून रडत आहे,!

सगळीकडे फिरून मी थकत आहे
जगण्याची अपेक्षा मी सोडत आहे,!
मी माझेच सरण रचून ठेवले बघा
थेंबभर पाणी शेवटी ते मागत आहे,!

ललित कुमार,,,,
wapp-7744881103
*******************