सैराट Movie बघून केलेली छोटीशी कविता

Started by Sasula, May 02, 2016, 10:23:21 AM

Previous topic - Next topic

Sasula

सैराट Movie बघून केलेली
छोटीशी कविता ...

खरं प्रेम भेटणं कठीणं झालं
खरं प्रेम करणारं कोणी नाय राहिलं ...
आणि भेटलं तर जगानी नाय मान्य केलं ..??

खरं प्रेम एकदा शोधाव म्हटलं
तवा कुठं परशाला आरची मधी दिसलं ...

प्रेमा मधी दोघांच मन एवढं गुंतलं
जगा मधी काय चाल भान नाय उरलं ...

भान जवा जाग्यावर आलं
तवा प्रेमा मधी गरीबी श्रीमंती दोन भाग झालं ...

गरीबी श्रीमंती मुळ त्यांच प्रेम
जगानं मान्य नाय केलं ...
तवा दोघान पळून जायचं ठरवलं ...

दोघान सुखाचा संसार माड़ायचं ठरवलं
काय दिवस उपास मार कराव लागलं ...

उपास मार करुन दिवस काड़लं
तवा कुट चागलं दिवस बघाया भेटलं ...

चांगल दिवस होत त्यांच आलं
दोन जिवाचे तिन जिव होतं झालं ...

राक्षसी जगाला हे नाय बघावलं
तवा त्याच्या जिवावर जग उठलं ...
 

मित्रानो पिक्चरचा शेवट मला नाही आवडला
आणि शेवट कवितेत सुद्धा करता नाही मला आला ...
तुम्ही जर सैराट बघितला असलं तर माझी छोटीशी
कविता कशी वाटली नक्की सांगा. ..???

#ससुला