राहून गेलं

Started by shamtarange, May 02, 2016, 03:35:00 PM

Previous topic - Next topic

shamtarange

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.
तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच
गेलं.
तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.
हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ
शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ
सांगायचं राहूनचं गेलं.
ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून
गेलं...
.
.www.fb.com/sham.tarange