सबला

Started by shamtarange, May 02, 2016, 09:22:19 PM

Previous topic - Next topic

shamtarange

नारी जातीच्या यशाची गाथा
सतत तू स्मरत रहा
नितांतसुंदर जीवनात ह्या
सबले तू सजग रहा
लाख संकटे येतील जरी
ढळू देऊ नकोस तोल
संकटातूनी मार्ग काढूनी
सिद्ध कर स्वतःचं मोल
चौथरे, गाभारे प्रवेशबंदी
हे सगळं फोल आहे
तुझ्या मनातला भक्तीभाव
हाच खरा अनमोल आहे
मुलाबाळांना शिक्षण दे
कर त्यांच्यावर सुसंस्कार
मुलगा,मुलगी भेद नको
कर स्त्रीभृणहत्या हद्दपार
कार्यालयातील अधिकाराचे
पद तू जरूर घे
घराचेही घरपण जप
मांगल्याचा सूर दे
मार्गामध्ये काटे येतील
कधी येतील मोठे अडसर
त्यातून मार्ग काढत तू
गाठ यशाचे उत्तुंग शिखर
अशक्य तुला काही नाही
विश्वास ठेव स्वतःवरी
कवेत घेण्या अंबरास ह्या
मुक्त , स्वच्छंद घे भरारी !
https://marathikavy.wordpress.com/