पैसा.....!

Started by Rajesh khakre, May 02, 2016, 10:08:55 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

पैसा

पैसा या जगातला फार
मोठा चमत्कार आहे
पैश्यावाल्याला सर्वांचा
वाकून नमस्कार आहे

पैसा असेल जवळ
खुशाली विचारेल दुनिया
तुझ्या पुढेमागे तोपर्यन्त
फिरेल सारी दुनिया

पैसा आहे तर सर्व आहे
नाहीतर जन्म व्यर्थ आहे
दारिद्रयाचे जीणे येथे
जणू निर्रथक आहे

पैसा आज या जगात
माणसापेक्षा मोठा आहे
म्हणूनच माणुसकीचा
आजही तोटा आहे

पैशामागे धाऊन धाऊन
जेव्हा धाप लागते
पाठीवर आधाराची
कुणाची थाप लागते

भावना जेव्हा वितळतात
आणि मन मऊ बनते
पैशांचे काम तेव्हा मात्र
तिथे काही ना चालते

हवा असतो हात तेव्हा
आत्मीयतेने ओलावलेला
पैशापेक्षा प्रेमाच्या
रंगाने रंगलेला

पैसा तेव्हा फक्त
कागद बनून राहतो
पैशावर माणुसकीचा
पुन्हा विजय होतो

माझ्या देवा तु मला
कमी-जास्त पैसा दे
माणुसकिचा झरा
मात्र भरभरुन दे

भोवती अनेक व्यक्ति जरी
एखादी अशी असू दे
माझ्या फक्त कर्तुत्वावर
तिला विश्वास असू दे
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com