हार्टबीट्स ७

Started by vishalingle25793, May 03, 2016, 01:20:23 AM

Previous topic - Next topic

vishalingle25793

"नकोत खोटि स्वप्ने
नकोत चंद्र तारे
साथ असेल तुझी
तर झोपडितच ठेव ना रे
महालाची आशा नाहियेय मला
मिठित तुझ्या फक्त जगायंच मला. ..
जगु शकते तुझ्याशिवाय पण मी
पण तुझ्याशिवाय जगणे व्यर्थ आहे
तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक
क्षणाला अर्थ आहे. .."
बोलता बोलताच ती अचानक शांत झाली
पाणावलेल्या डोळ्यांनी आमची नजर एक झाली
"जिथे फक्त आपण दोघंच असु
दुर कुठेतरी घेउन चल मला. ..
असा मला तु छळतोस का रे. ..?"
बोलायला शब्द उरलेच नव्हते
हरवले न जाने शब्द कुठे
ओठांवरचे माझ्या सारे. ..

- विशाल
(7776943516)

Suyog Surve

changali kavita aahe ..... lihit raha