हार्टबीट्स ८

Started by vishalingle25793, May 03, 2016, 01:26:06 AM

Previous topic - Next topic

vishalingle25793

कितीतरी वेळ बसलो होतो मी...
समुद्राच्या किनार्यावर...
एकटाच...
आठवनींच्या सोबत...
क्षितिजाकडे बघत...
भयानक संध्याकाळ होती...
आणि सोबतीला...
थकून...
तुटून...
पडणारा सूर्य...
रडणारा सूर्य...
अश्रूच त्याचे...
जणू समुद्राचे सर्व पाणी...
खारं झालं असेल न जाने...
कितीतरी माझ्यासारख्यांच्या अश्रूंनी...
उचंबळुन येणारी भरती...
आणि परतीस निघालेले पक्षी...
बस्स्स...
एकीकडे क्षितिजावर...
आकाश पृथ्वीचं मिलन होत होतं...
दुसरीकडे मात्र एक पाखरू...
एकटंच तळमळत होतं...
आयुष्यात अंधार पसरवत...
सूर्य ही बुडून गेला...
लाटा शांत झाल्या...
पानी संथ...
उरलो फक्त मी...
आणि माझा एकांत...
वाट बघत राहलो मी...
अख्खी रात्र...
तारे मोजण्याची उगाच थट्टा करत...
कधी ढगाआड दडलेल्या चंद्रासोबत...
तर कधी स्वतः सोबतच बडबडत...
पण...
तू आलीच नाहीस...

- विशाल
(7776943516)