हार्टबीट्स ९

Started by vishalingle25793, May 03, 2016, 01:39:49 AM

Previous topic - Next topic

vishalingle25793

येईल न पक्षी परत घरट्याकडे?
अंगणातला गुलमोहर फुलेल न पुन्हा?
समुद्रकिनार्यावर उमटेल
आपल्या दोघांच्या पावलांचे ठसे,
येतील न ते सारे क्षण पुन्हा?
रोज संध्याकाळी दोन चंद्र असतील न?
एक आकाशात,
एक माझ्यासोबत...
चांदण्यांनी गजबजलेलं असेल न आकाश पुन्हा?
दरवळेल न चंदनाचा गंध?
तुझी साद घेवून येईल न हा वारा?
सकाळी सकाळी जाग येईल
पक्ष्यांच्या किलबिलाटीने,
उगवेल न सूर्य आशेची किरने घेवून?

- विशाल
(7776943516)