हार्टबीट्स ११

Started by vishalingle25793, May 03, 2016, 01:51:51 AM

Previous topic - Next topic

vishalingle25793

काही काही पानं
कोरीच बरी असतात...
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं...
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं...
मुद्दामच...!
पण आज रहावलंच नाही...
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या...!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित...
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा...!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं...
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून
कचरापेटीत...
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता...?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं...
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची...
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही...
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी...
काही पानं जशी असतात तशीच बरी
असतात...
कोरीच...!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात...
पानावर नाही, मनावर कोरलेले...!!!

- विशाल
(7776943516)