हार्टबीट्स १२

Started by vishalingle25793, May 03, 2016, 01:54:32 AM

Previous topic - Next topic

vishalingle25793

तुझ्यात आणि माझ्या कवितेत
ऐवढा दुरावा का आहे माहितेय?

मी करू शकतो विश्लेषण
माझ्या प्रत्येक कवितेचं
कवितेतील प्रत्येक ओळीचं
आणि प्रत्येक शब्दाचं सुद्धा
तुला जाणण्याचा वसंता
मी करतोय प्रयत्न फक्त...

मी करू शकतो कविता
एकाकी चंद्रावर
अंधार्या रात्रींवर
पावसांच्या घनदाट सरींवर
ग्रीष्माच्या दाहक सूर्यावर
हिरव्यागार झाडाच्या
वाळलेल्या फक्त एका पानावर
चैतालीच्या पालवीचं रहस्य मात्र
मला कळलंच नाही अजुन...

लिहू शकतो मी
स्मशानाच्या पडक्या भिंतींवर
भिंतींच्या प्रत्येक विटेवर
जळणार्या चितेवर
चितेच्या झालेल्या राखेवर
आणि विझलेल्या दिव्यावर सुद्धा
बघितलीच नाही पण
तुझ्या सकाळी फुलपाखरे
आणि फूललापाखरांचे रंग...

माहित नाही का करतात सर्व
तुझं नेहमीच गुणगान
मला तर असह्य होतो
कोकिळेचा कर्कश आवाज
तोडाविशी वाटतात ही
माझ्यावर हसणारी उद्धट फुले
जमत नाही इतरांसारखं
सुन्दर कल्पनेच्या शुन्यात रमणं
आणि कधीही माझ्याशी
न जुळलेल्या तुझ्यावर लिहिणं...

- विशाल
(7776943516)