एक अपूर्ण प्रेम कहानी....

Started by Pranav dhaigude, May 03, 2016, 10:42:15 AM

Previous topic - Next topic

Pranav dhaigude

कवी प्रणव धायगुडे

( आयुष्यात खुप मूली येत असतात..... त्यातील कोणीतरी तरी एकच अशी असते जी बरोबर असताना अस वाटत आपल्या जगण्याला अर्थ आलाय.... पण ति एकच कधी कधी असा कालजावर्ति आघात करुन जाते ना....  परत प्रेम करण्याची इच्छा पण होत नाही......)

तुझ्याविना आज सगळ काही उन वाटतं
आहेत भवताली माणसे तरीही सुन सुन वाटतंय
आज आपल्या नात्याबद्दल थोड़ लिहावस वाटल
ढासाळताय मन माझ तरीही खोल शिरावस वाटल

अनोळखी होतिस तू माझ्यासाठी , ओळख तूच वाढवलिस
भेटिच्या ओढीपायी भेट हि तूच घडवलिस
पहिल्या भेटीचा सहवास कमालच करुन गेला
मैत्री करावी की प्रेम प्रश्नच उभारूंन गेला

तुला भेटण्याची माझी ओढ़ वाढतच गेली
जणू नव्या आयुष्याला माझ्या सुरवातच झाली
मैत्री की प्रेम तुझी द्विधा मनःस्थिति असायची
गोंधळलेल्या तुझ्या कोमल चेहऱ्यावरची ती लकेर  स्पष्ट दिसायची

तू जरा सोबत असलिस की खुप काही मिळवल्यासारख वाटायच
नात हे आपल जणू एका बंध गाठित असायच
तिच गाठ आता सैल झाल्याचे भासते
नाते हे आपले विखुरताना दिसते

नविन मित्र मत्रिणींमध्ये तू हारउन गेली आहेस
हळू हळू मला तू आता विसरून गेली आहेस
विखुरलेल्या नात्याकडे बघून तुझे वचनबद्ध शब्द आठवतात
("विसरणार नाही रे मि वेड्या तुला , निविन मित्र भेटल तर कोण विसरत का जुने मित्र") अभावनिक शब्द आठवून कंठ दाटुन येतात

अजूनही तू दिलेली frndship band न्ह्याळत बसतो
जर दूर जायचच होत तर जवळ आलती कश्याला हाच प्रश्न त्याला विचारत असतो
बिर्थ डे ला दिलेला शर्ट ही आता कूजत चाललाय
जनु नात्यातील दुरावा आपल्या दाखवायला लागलाय