✩एक विचारी मन✩

Started by kuldeep ugale patil, May 03, 2016, 01:18:18 PM

Previous topic - Next topic

kuldeep ugale patil

✩एक विचारी मन✩

सर्व काही सुरळीत चालु आहे अस वाटत असतानाच आयुष्यात अशी काही मानसं मिळतात की त्यांच्यासाेबत कसं वागावं हेच कळत नाही...
खरं तर पहील्या-वहील्या भेटीतच कुणाशी कसं वागावं हे कळुन चुकतं,,
पण ह्यांना कितीही भेटा..अगदी दिलखुलास गप्पा जरी केल्या तरी यांच्या स्वभावाचा तिढा सुटत नाही...!!

त्याच्या निरागस मनाचा त्यांच्या खळखळून हसणा-या हसवना-या स्वभावाचा Attractive फाेर्सच ईतका असताे की आपण नकळतच आकर्षिले जाताे...
आणि मग एकच गाेष्ट सुरु हाेते वाहण्याची... त्यांच्या प्रवाहात वाहत जाण्याची...!!

पण का कुणास ठावूक, कधी कधी हे सर्व आवडतही...स्वतःला स्वतंत्र न ठेवता त्यांच्याच विचारात स्वतःला अडकवायला..ते घेउन जातील अगदी तिकडेच जायला...

कधी कधी आयुष्यात सर्वात जवळची तीच माणसं असतात तर कधी सर्वात लांबचीही तीच...कधी जीवनातला सर्वाेच्च आनंद देनारे पण हेच असतात तर कधी जीवघेणा त्रास देनारे ही हेच..यांच्याशी कधी कधी बाेलायला दिवसरात्र ही पुरत नाही तर कधी अगदीच निशब्द !!

कधीतरी वाटतं कि झुरकाऊन द्याव या सर्व विचारांना बाजुला अन् जगावी एक मस्त मनसोक्त Life...'पण ते तर अगदीच अशक्य !!'
कदाचित हिच वाईट वेळ असेल 'एका विचारी मनासाठी' !! 


-COOLdeep♡  :angel: