संसार....!!!

Started by Ravi Padekar, May 03, 2016, 06:17:47 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

          संसार...

संसार म्हटलं की चालायचच
भांड्याला भांड हे लागायचच...

कधी आळणी तर कधी खारट
कमी जास्त संसारात होतय मीठ
कधी तुपाशी तर कधी उपाशी
कारण ऐनवेळेला संपलेल असतय पीठ

संसार म्हटलं की चालायचच
भांड्याला भांड हे लागायचच...
   
दोघांमधल्या भांडंनाने,
कुणास नसते कसली सुध
गॅस वरल्या टोपामधले
कधी उतू गेलेलं असते दूध

भांडण झाले रात्री तरीही
मुक्याने असतो डबा तयार
नजरेने चालते बोलणे तरीही
राग शांत पडतो गार...

रुसवा फुगवा ठेवूनी कोपर्‍यात रुसून बसायच
संसार म्हटलं की चालायचच
भांड्याला भांड हे लागायचच...

चार भिंतीतला संसार
पण देते घराला घरपण
काटकसर करुनी तिने,
चालते घर तिच्या श्रमातून

घरी आल्यावर पहिले त्याने
चेहर्‍यावरचे तिचे मौन
बॅगेमधून हळूच काढल्या
शालीमार पैठण्या दोन

लाज येताच गाली तिने हळूच मान वळवायच
संसार म्हटलं की चालायचच
भांड्याला भांड हे लागायचच...

कवि:- रवि पाडेकर(मुंबई) ;)
मो:- 8454843034.