अंत प्रेमाच्या आशेचा

Started by Shri_Mech, May 03, 2016, 09:07:12 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

अंत प्रेमाच्या आशेचा


मिटल्या सर्व आशा,
विझले दिवे प्रकाशाचे,
दाटले गडद काळे ढग,
सरली अंगातली सगळी रग,

प्रयत्नांचे पहाड रचून झाले,
सगळ्या वाटा चालून झाल्या,
विचारात डुबकी घेऊन झाली,
संधी मोलाची तरी ना मिळाली,

मदतीला खूपजण धावले,
वाट दाखवणारेही बहुत मिळाले,
काहींमुळे तर मन गहिवरले,
तरीही शोधाचे फलित ना मिळाले,

असा हा प्रवास अंतासमीप आला,
या धडपडीला न्याय ना मिळाला,
कसा हा कोप नियतीचा झाला,
किंचितश्या सुखापायी जीव झिजवला,

त्याच्या दयेची भिक
नव्हतीच माझ्या नशिबात,
जगासाठी प्रेमाचा पाऊस पडणार्याने,
एक थेंबही मला न दिला...

Shri_Mech
Shri_Mech