आठवणी...

Started by Pravin Raghunath Kale, May 05, 2016, 01:25:13 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

आठवणी...

तसाही मी रमत नाही
सहसा, माझ्या भूतकाळात
आणि डोकवांवही वाटत नाही
मला माझ्या आठवणीत

आठवणी असायला हव्यात
आठवून स्वतःशी हसायला
खरतर आठवणी हव्यात
स्वतःवर खूष व्हायला

कधीतरी आठवणी घाव घालतात
मनावर जून्या प्रसंगातून
मन सुन्न होत राहतं
जुन्या कटू आठवणीतून

आठवणी वाहत नेतात
भविष्याला भूतकाळासोबत
आठवणी संघर्ष घडवतात
स्वतःच्याच मनासोबत

तसाही मी रमत नाही
सहसा, माझ्या भूतकाळात
आणि डोकवांवही वाटत नाही
मला माझ्या आठवणीत....

प्रविण रघुनाथ काळे
Www.facebook.com/kalepravinr
Kalepravinr.blogspot.in