शब्द वेडा मी...!

Started by Ravi Padekar, May 05, 2016, 03:42:45 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

शब्द वेडा मी...

कवि झाल्यापासून हे शब्द झोपू देत नाही
बंद डोळ्यांनाही स्वप्नात सांगतात काही

कधी उंच धबधबा, तर कधी खोल दरी
रंगवतील हेच शब्द कधी कवितेतील परी
कधी पाखरू बनून नेतील आपल्याला स्वप्नांच्या घरी
डोळ्यासमोर  कधी  ठेवतील चिंब पावसाच्या  सरी

हेच शब्द कधी हसवतील ही
तर कधी एखाद्याच्या काळजाला जाऊन भिडतील
कुणाचं हास्य तर कुणाचं रहस्य बनतील
कुणाचं प्रेम तर कुणाचं विरह
कविता करायला भाग पाडतील...

चंद्र,सूर्य, तारे घेऊन येतील
आणि सोडतील या ओंजळीत...
कधी आई तर कधी बाबा
कधी आयुष्य तर कधी शाळा
उतरवतील फक्त चारोळीत

कवि झाल्यापासून हे शब्द झोपू देत नाही
विचारांचे चक्र काही थांबवत नाही...

कवि:- रवि पाडेकर(मुंबई) ;)
मो:- 8454843034