खरचं मित्रांच असच असत बोलणं.

Started by Dnyaneshwar Musale, May 05, 2016, 06:10:09 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

बाकावर जागा धरून ठेवणं
तर कधी डबे चोरून जेवणं
भनभनलेल्या वाटेवर हसत खेळत चालणं
कधी दडवलेल्या जखमेवर एकमेकांशी बोलणं
खरचं मित्रांच असच असत बोलणं.

कट्टी बट्टी करून एकमेकांशी वागणं
दुखल खुपल तर संगतीनं जागणं
चिघळलेल्या चुकांना तुझं माझं करून झाकणं
होणाऱ्या शिक्षेला आनंदाने सगळ्यांनी वाकणं
खरचं मित्रांच असच असत बोलणं.

झिपऱ्या झिपरी म्हणुन एकमेकांना चिडवन
उगाचच शब्दांच्या खेचा खेचीत रडवण
सोबत जरी असलं दुःखाच मोठं थिगळ
नाही हे मित्र येऊ देणार डोळ्यातुन कधी वगळ
खरचं मित्रांच असच असत बोलणं.

जरी झाली रडकुंडीची मारामारी
तरी गोडीने देतील खांडभर सुपारी
कधी उशीर झाला म्हणुन एखादा msg धाडणार
मैत्रीचा हात, पण हे हातातुन कधी नाही सोडणार
खरचं मित्रांच असच असत बोलणं.

हे मला ते मला करत ताटं करतात उष्टी
समजल्या तरी सांगत नाही कुणाला मैत्रीतल्या गोष्टी
तुझी माझी करत सुरूच असते चढाओढ
नाही म्हटलं तरी प्रत्येकाची  मैत्री असते गोड
खरचं मित्रांच असच असत बोलणं.

मैत्री म्हणजे नसतो कुणाला कसलाही भार
खरतर बनत असतो एक मजबुत आधार
ते नसतात नुसतेच मित्र
त्यांच्या विना रंगत नाही आयुष्याचं चित्र
खरचं मित्रांच असच असत बोलणं..

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]