तुझ्याविना गं आई

Started by ashok more, May 06, 2016, 02:21:27 PM

Previous topic - Next topic

ashok more

तुझ्याविना गं आई 
झोपच नाही येत मला
लहान पिल्लू बोबड वाणी
सांगू गं कसा तुला

तुझ्या कुशीतच स्पर्श तुझा
कळला गं जन्मा आधीच
तुझं आणि माझं नात
जुळल होत गं कधीच

तुझ्याच दुधावर माझी
भागते गं भूक तहान
झालो नाही अजून मोठा
तुझा गं पिल्लू मी लहान

रुसून कधी मजवर आई
लोटू नकोस गं दूर अशी
तुझ्या मायेच्या पंखाविना
झोप मला गं येईल कशी

होईन आता शहाणा मी
देणार नाही गं त्रास तुला
नाही करणार दंगामस्ती
कुशीत घेऊन झोप गं मला

                    अशोक गं. मोरे