प्रवास?

Started by शिवाजी सांगळे, May 06, 2016, 08:59:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रवास?

सारेच ते सोबती
अधुर्‍या प्रवासाचे,
शेवटास उरतात
क्षण आठवणींचे !

आपणच ठरवितो
नियम जगण्याचे,
विसरतो कधीकधी
आम्ही दान दैवाचे !

कळावे ना कसे?
बंध ते परस्परांचे?
पहावे विसरून केंव्हा
भाव स्वार्थी मनाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९