आई

Started by Vinod Thorat, May 08, 2016, 04:47:59 AM

Previous topic - Next topic

Vinod Thorat

आई

सकाळी भल्या पहाटे सुरु होणारा तुझा दिवस
रात्री सगळं आवरल्याशिवाय संपत नाही
एवढं सगळं करताना तू दमत कशी नाहीस
हेच मला कळतं नाही

प्रत्येक सणवार साग्रसंगीत करतेस
देवधर्मही मनापासून करतेस
देवाकडे स्वतःसाठीही काही मागतेस कि फक्त आमच्यासाठी
हेच मला कळत नाही

सगळ्यांची आजारपण काढणारी तू
स्वतः आजारी कधीच पडत नाहीस
सगळ्यांच सगळं करताना स्वतःला मात्र कशी विसरतेस
हेच मला कळत नाही

इतकी वर्ष झाली तुझ्यापासून दूर राहून
पण प्रत्येक वेळी तुझा निरोप घेताना
डोळ्यातले अश्रू थांबत कसे नाहीत
हेच मला कळत नाही

देवाला न मानणाऱ्या मला
तो दाखवून देतो त्याच अस्तित्व तुझ्यातून नेहमी
देव तरी आई तुझ्यापेक्षा वेगळा काय असेल
हेच मला कळत नाही

- विनोद थोरात, जुन्नर
मोबा. 8983448219