आई

Started by priyadudhbhate, May 08, 2016, 01:37:03 PM

Previous topic - Next topic

priyadudhbhate

                   "आई"
आई,
      तुझ्या गर्भात त्या मंद प्रकाशात
      मी जगत होती  त्या मंदिरात
      या भयाण जगापासुन लपवित
      जगत होते मी आणि माझे मित

     तुझ्या ह्दयाची ध्वनी  गोड होती
      ती स्पंदने ज्यावर मी जगत होती
    तुझ्या आवाजानेच तर मी हसायची
    तुझ्याच आवाजाची वाट माझे कान                     बघायची

   तुला आणि मला जोडणारी एक         कोमल दोर होती
   त्या नाळेभोवती मी लपेटलेली
होती
   तु माझ्यासाठी किती काळजीत
होती
   जणू वेलीवरची कळी वाढवीत होती

   माझी नऊ महिने आतुरतेने वाट पाहणारी तू
    शेवटी खुप त्रास सहन करुन जन्म मला दिला तू
   तुला "आई" म्हणन्यासाठी मी बोलायला शिकली
   अन् शेवटी तुझा हात पकडण्यासाठी धडपडायला मी शिकली