आठवणींने तुझ्या ग आई…

Started by sachinikam, May 08, 2016, 07:10:55 PM

Previous topic - Next topic

sachinikam


आठवणींने तुझ्या ग आई...
--------------------------------------------
कवी: सचिन निकम. पुणे.
sachinikam@gmail.com
--------------------------------------------
आत्ता इथे, आहे सर्वकाही
भासे उणीव तुझीच मला
मैफिलीत परक्यांच्या
उठला काळजात गलबला
मायेची कुशी, ममतेची उशी
मिळते का कुठे विकायला (२)
आठवणींने तुझ्या ग आई sss
जीव कासावीस झाला ।।१।।


जेव्हा होतीस, जवळी माझ्या
नव्हती कसलीही भीती मला
प्रेमाचा घास, ओढीचा श्वास
आसवांमधुनी दरवळला
येशील कधी, तू भेटायला
लाडक्या लेकराला कुरवाळायला (२)
आठवणींने तुझ्या ग आई sss
जीव कासावीस झाला ।।२।।


ती तुझी, भाबडी माया
लावी ओढ जीवाला
येता दमून, थकून भागून
निजवी थोपटून सोनूला
काय बरे, काय खरे
तारलेस वेळीच मनाला (२)
आठवणींने तुझ्या ग आई sss 
जीव कासावीस झाला ।।३।।

पाहतो जेव्हा, दुसऱ्या आईंना
लागे काळजी मनाला
देई साद, घरटे अपुले
फिरावे परत ह्या क्षणाला
सोसू कुठवर, हा दुरावा
मायेच्या सावलीचा गारवा (२)
आठवणींने तुझ्या ग आई sss
जीव कासावीस झाला ।।४।।
--------------------------------------------