ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 08, 2016, 09:51:33 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar


नको सोडू रे बाळा मला
वृध्दआश्रमाच्या दारात,!
मोलकरीण म्हणून बाळा
राहीन रे तुझ्याच घरात,!

नऊ महिने, नऊ दिवस
तु माझाच हिस्सा होतास,!
जगातील घडामोडी माझ्या
तु डोळ्याने पहात होतास,!

पाहिलच असेल तु मला
संसाराचा गाडा ओढतांना,!
दिनरात राब राब राबून
तुझ्यासाठी स्वप्न रंगवतांना,!

मला कामावर असतांनाच
जोराच्या कळा सुरू झाल्या,!
तुझ्या येण्याच्या खुशीनेच मी
त्या खोल काळजात दडवल्या,!

तु आला जगामध्ये, तेव्हा
ते माझे सुखद क्षण होते,!
तुझ्या इवल्याश्या बोटांनी
पहिले माझे बोट धरले होते,!

आज तेच बोट धरून तु
मला वृध्दआश्रमात आणले,!
जाता जाता सांगावेसे वाटते
माझ चूकले हे जग तुला दावले,!

ललित कुमार,,,,,
wapp-7744881103 i
*****************

Balaji lakhne

लाख करोड
तुझ्या समोर
चिल्लर आहेत..
.
कारण तुझ्या
कडे एक मौल्यवान
हिरा आहे...
.
म्हणजे मी आहे...

Lalit kumar