Vrutti

Started by Anant_Vrutti, May 08, 2016, 11:25:46 PM

Previous topic - Next topic

Anant_Vrutti

भ्रम

फाटलेल्या लुगड्यात कोंबलेली
जीर्ण झालेली हाडे लपवित
एक क्षिणलेली म्हातारी
घराच्या कोपऱ्यात बसून
एकटक काहीतरी न्याहाळत होती..

तिच्या कपाळरेषा आणि हातापायाच्या भेगा
तिचा जीवनसारांश स्पष्ट करीत होत्या...

तिच्या नजरेने तिचा भूतकाळ चाचपण्याचा प्रयन्त
केला मी, काहीच जाणवले नाही...

म्हातारी बघत असलेल्या दिशेने,   
समोरच्या खुराट्यात,
कोंबडी अंड्यांना उब देत बसली होती

छताच्या कोपऱ्यात खोचलेल्या घरट्यात,
चिमणी लहानग्या चोचींमध्ये घास भरवत होती

म्हातारीच्या पायाला चिकटून बसलेल्या कुत्रीच्या स्तनांवर,
पिल्लांची गर्दी जमली होती...

पाणावलेल्या डोळ्यांनी हे सर्व बघणाऱ्या म्हातारीसाठी,
ते हृदय विदारकच होते बहुदा..
आणि त्याचवेळी...
दूर शहरात, शरीरडोक्याने मोठा झालेला
त्या म्हातारीचा चिमुरडा,
थंड बिअर चा आस्वाद घेत
अत्यंत महागड्या स्मार्टफोनवरून
" जागतिक मातृ" दिनाचे शुभेच्छा
संदेश पाठविण्यात व्यस्त होता....

अनंत कापसे

Ravi Padekar

real fact... nice one