ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 09, 2016, 12:33:58 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

काही अर्धवट डोक्याचे
अर्धवट विचार सांगतात
याचे काही त्याचे ऐकून
मग कुत्र्यासारखे भुकतात!!

ते काय बोलता, त्यांना 
कधीच समजलेले नसते
देश, समाज हित कशात
कधीच उमजलेले नसते!!

फक्त कुठतरी बाजू धरून
आपल पोट भरत असतात
स्व विचार गहाण करून
भलत्याचे मांडत सुटतात!!

विचार करून बोलत नाही
हे बोलून विचारात पडतात
किडेमकोड्याच्या जमातीचे
जाती, धर्म, पंथवाद करतात!!

ललित कुमार
Wapp-7744881103
****************