प्रेम - गेम

Started by vishal maske, May 09, 2016, 02:14:45 PM

Previous topic - Next topic

vishal maske

प्रेम-गेम

जाणून बुजुन ती
झाली होती वेडी
जमेल म्हणाली ती
तुझी माझी जोडी

संसारात तुझ्या
मला रमवुन घे
जीवनात तुझ्या
मला सामावुन घे

गोजीरवाणी ती
केविलवानी ती
ह्रदयात रूतलेली
मंजुळ वाणी ती

तीची दिवाणी अदा
डोळ्यांमध्ये भरली
माझी जीवन साथी
हो तीलाच मी हेरली

संगे संगे जगण्याच्या
घेतल्या आणा भाका
पण कसा नियतीने
टाकला होता डाका

घेतल्या आणा भाकांना
किंमत शुन्य केलं होतं
आमच्या प्रेमाचं रुपांतर
ब्रेकअप मध्ये झालं होतं

अहो जीच्यासाठी मी
मलाच होतं सोडलेलं
आज तिनेच देऊन दगा
हो,मला होतं तोडलेलं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* फेसबुक पेज :- https://m.facebook.com/माझ्या-कविता-विशाल-मस्के-1435862836646658/?ref_component=mbasic_bookmark&ref_page=XMenuController