वृत्ती

Started by Anant_Vrutti, May 09, 2016, 03:07:41 PM

Previous topic - Next topic

Anant_Vrutti

वात्सल्य

कळीविना वाकली पुष्पसरिता
मायेची आक्रन्दली ममता
दाटला काळोख अंगणी
आता तरी घरी परता...

पडताच सडा, जन्मतात ज्योती
क्षणात नभी चमकतात मोती
खेळी चिमुकले ज्या क्रिडांगणी
पसरली तिथे शून्य शांतता...

वाट पाहुनी जीव अरुंदला
देव्हाऱ्यातील दीप मंदला
घाली लोटांगण, दोन्ही भुजांनी
ऐक मागणे हे अनंता...

दाटला काळोख अंगणी
आता तरी घरी परता...

-अनंत कापसे