माझी आई….

Started by paone05, May 09, 2016, 04:28:42 PM

Previous topic - Next topic

paone05

नको ग हा रुसवा, नको ग हा अबोला..., मोठा जरी झालो तरी त्रास होतो...
आई तुझ पासुन दुर झाल्याचा भास होतो.... :( !!

आई..., मी वयानी कितीहि मोठा झालो, तरी तुझ्या साठी असेल शेवट पर्यंत तान्हा...
कारण वासरा शिवाय, गायीला पण फुटत नाही पान्हा...!!

कशे.... ??? कशे ग तुझे प्रेम.... ?? मारून दूर करते तर क्षणात जवळ हि घेते...
अनं, मी उगीचच माझ्या लेकरावर हात उचलला, रागावले याची जाणीव करून देते... ;) !!

आई तुला त्रास होईन अस कधी मी वागणार नाही...
पण तुझ्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्याला, मी कधी चांगले बघणार नाही.... :mad: !!

काही चुकलं, वाईट बोललो, तर लगेच असायची आई काठी घेऊन आमच्या पाठी...
कारण बाबा नसल्यामुळे, खूप त्रास सहन केला आहे तिने आमच्या साठी.... !!

"ती" आहे म्हणून, नाही आमच्या डोक्याला ताप ...
कारण तीच आहे आमच्या साठी माय - बाप.... !!

तिचा आवाज म्हणजे एक गर्जना...
तिच बोलणं म्हणजे प्रेमाची हाक...
म्हणून हे यमराज, जर तुझी नजर ::) तिच्यावर पडली तर प्लीज तुझे डोळे झाक...!!

--- पवन शंकरराव थोंबे
मो. न. ८९८३४१२३७२

Sahil ganesh shinde


Sahil ganesh shinde

Thank you for this post this poem is very beautiful