दुष्ट-काळ

Started by priyadudhbhate, May 10, 2016, 07:16:33 PM

Previous topic - Next topic

priyadudhbhate

              प्रवास पाणी ते अश्रु
जेव्हा दारिद्रयरेषेखालचा माझा बाप
सोसतो दुष्काळाच्या झळा
भुकेपोटी विचार करून करून
त्याच्या पोटात येती कळा

कुटुंबाची काळजी करून
रडला असेल कितीतरी
पण आम्हाला बोलेल, लाल झालतं का डोळं?
डोळ्यात गेलं काहीतरी

जमीनीने तर केव्हाच साथ सोडली
ती तर किती भेगा सहन करणार ?
झाडाची पानं तर कधीच हरवलीत
अन् वाटत झाडपण आता जमीनीलाच मिठी मारणारं

मग मुक्या जनावरांचा तर प्रश्नच नाही
त्यांना पाणी मिळत नव्हत
तर माझा बाप कितीतरी रडला होता
बहुतेक त्या अश्रूंचच पाणी तो त्यांना पाजत होता

वाटतं कधीतरी संपून जाईल हा दुष्काळ
पुन्हा पिकेल हे रान हिरवेगार
पण वरचेवर हे चित्र जास्तच जाणवतयं
अन् शेवटी पाणी म्हणून मिळतोय अश्रूंचाच आधार