बोध

Started by शिवाजी सांगळे, May 10, 2016, 08:17:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

बोध

कशापासून काय बोध घ्यावा?
हे प्रत्येकाच्या स्वभावावर असतं,
अनुकरण करायचं जरी असेल? ते
कुणाच करताय हे पहायचं असतं !

काहीबाही पाहून जगतात काही
चित्रपट पाहून का जगता येतं?
काँपी करून चित्रपटाला अखेरी
कुणाच्याही आयुष्याचं सैराट होतं !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९