रूप तुझे...

Started by गणेश म. तायडे, May 12, 2016, 08:49:37 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

विझता ठिणगी
भडकूनी गेली
बांधलेली भावना
वाहूनी गेली
जपलेले हृदय
क्षणात हूरहूरते
मन माझे का
उगाच बावरते
उघड्या डोळी
स्वप़्न का पडते
चेहरा नाजुक तुझा
मला का छळते
आवर तुझ्या रूपाला
जीव माझा गहिवरते...

- गणेश म. तायडे,
   खामगांव