बरस रे...

Started by गणेश म. तायडे, May 12, 2016, 05:46:08 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

विसरून रूसवे फुगवे
यंदा तरी तु बरस
नको देऊ मुठभर
दे सुख कणभर
नको सोन्याचा घास
हवा मातीचा सुवास
देव दगडी राऊळात
आता तुझ्यावर आस
खेळ खेळला जिवघेणी
यंदा तु जोरात बरस
होणेजाणे का मज हाती
प्रार्थना हि कर जोडूनी
दुबार पेरणी नको यंदा
ना हो सावकारी धंदा
मुलीचे लग्न करायचे
शाळेत मुलं पाठवायचे
बायकोला सुख द्यायचे
थोडं मज यंदा जगायचे
एकच मागणे तुजपाशी
यंदा नको कुणी उपाशी

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com